मुंबई : राज्य सरकारने करोना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध आणि वीकेंड लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून नव्या नियम लागू करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.., असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लॉकडाउनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शवली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाउन सदृश्य निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करताहेत, असं या पत्रात म्हटलं आहे.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.. pic.twitter.com/1U9LuvklhW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षेचा निर्णय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार”
“गृहमंत्रिपदाचा पदभार घेताच दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा”
अजितदादांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादीत प्रवेश करतोय, भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा
“अजिंक्य रहाणेची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्णच”