Home महाराष्ट्र “गृहमंत्रिपदाचा पदभार घेताच दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा”

“गृहमंत्रिपदाचा पदभार घेताच दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा”

मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा पदभार देण्यात आला आहे. आज दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला असून कामाला लागले आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. स्वच्छ प्रशासन हा माझा प्रयत्न राहील, प्रशासनात माझा कुठला राजकीय हस्तक्षेप असणार नाही’ असं म्हणत राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला असून राज्य सरकार सर्वोच न्यायालयात आव्हान देणार आहे, अशी घोषणाही वळसे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, कोव्हिड काळात सर्व पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. या जबाबदारीबरोबरच ते कायदा सुव्यवस्था देखील सांभाळत आहेत. सर्व धर्मियांचे सण याच महिन्यात मोठया प्रमाणात आहे. आमच्याकडून सर्वसामान्य जनता, महिला यांना मोठ्या आशा आहेत. पण सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असं वळसे पाटील म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

अजितदादांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादीत प्रवेश करतोय, भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा

“अजिंक्य रहाणेची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्णच”

MPSC परीक्षार्थींसाठी रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ महत्वाची मागणी

“येत्या 40 दिवसांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल”