नागपूर : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र सुदैवानं त्यांना कोणतीही ईजा झाली नसल्याचं देखील कळतं आहे.
नितीन गडकरी हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. सोनेगाव येथील तलाव सौंदर्यकरणाच्या भूमिपुजनासाठी नितीन गडकरी गेले होते. भूमिपुजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर गडकरी सात गाड्यांच्या ताफ्यासह घराकडे रवाना झाले. छत्रपती चौकातून जात असताना ट्रकने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे ताफ्यात सर्वात पुढे असलेली गाडी ट्रकला धडकली.
दरम्यान, शनिवारी रात्री ही घटना घडल्याचं समोर येत आहे. मात्र या अपघातात कोणीही जखमी झालं नसल्याचं कळतंय. तसेच अपघाताची पाहणी केल्यानंतर नितीन गडकरी आपल्या निवासस्थानी परतले.
महत्वाच्या घडामोडी –
ईडी लावली, तर सीडी काढेन; एकनाथ खडसेंकडून पुनरूच्चार
खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग यांच्या मुसक्या आवळणंं गरजेचं- हसन मुश्रीफ
मुंबई महापालिका स्वबळावर जिंकली पाहिजे, कुणाची लाचारी आपल्याला नको- संजय राऊत
“ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले असतील, त्यामुळेच त्यांनी परब यांना नोटीस पाठवली असेल”