आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. भाजपने 19 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 8 जागांवर विजय मिळवता आला. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
हे ही वाचा : “महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण”
अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणेंनी अजित पवारांना लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते, नितेश राणेंचं बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चालतात. माझ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही, अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असं राणेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
गेल्या 4 दिवसात कोकणात काय काय घडलं, ते सर्व अमित शहांना सांगणार- नारायण राणे
काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही- महादेव जानकर
राज्यातील विरोधी पक्ष भरकटलेला आहे, त्यामुळे…; संजय राऊतांची टीका