Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांना अच्छे दिन सांगणं म्हणजे…; मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर फडणवीसांचा पलटवार

उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांना अच्छे दिन सांगणं म्हणजे…; मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर फडणवीसांचा पलटवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल औरंगाबाद याठिकाणी जाहीर सभा पार पडली. या सभेत जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अच्छे दिन कोठे आहेत म्हणत मोदी सरकारसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना, कळलं देखील नाही की…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही,  पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि…! माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्‍यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार? टोमणेसभा, असं ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणाला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

…तर किरीट सोमय्याचं थोबाड लाल करू; औरंगाबादच्या सभेत शिवसेनेचा इशारा

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाही?; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

विधानपरिषदेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्याही उमेदवारांची नावे निश्चित; ‘या’ जुन्या नेत्यांना मिळणार संधी