लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

0
148

मुंबई : लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत आयएनएस आणि सी-व्होटर्सने देशपातळीवर एक सर्व्हे केला. लोकप्रिय 5 मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश करण्यात आला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे. मुख्यमंत्रीपद हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्त्वाचं लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसं करता येईल हेच माझं ध्येय आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला. माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकारी या सर्वांचे आभार. अर्थात तमाम शिवसैनिकांचे प्रेम व शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांचा आशीर्वाद याशिवाय ही झेप शक्य नाही अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“…तर लॉकडाउनमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल”

आशिष शेलार यांनी मानले संजय राऊत यांचे आभार; म्हणाले…

करोना रूग्णांची आकडेवाडी कमी दाखवून फायदा नाही; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here