उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का; राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

0
762

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

दापोली : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णय निवडणूक आयोगाने दिला यानंतर उद्धव ठाकरे हे चांगलेच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरेंनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम लवकरच मातोश्रीवर येऊन हाती शिवबंधन बांधणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : पुणे मराठा महासंघा तर्फे भव्य शिवजयंती उत्साहात साजरी

राष्ट्रवादी नेते संजय कदम हे दापोली मंडणगड मतदारसंघातील शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे कदम पिता-पुत्रांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून ही खेळी खेळण्यात येत आहे.

दरम्यान, संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ निर्माण झाली.

महत्त्वाच्या घडामोडी –

भावी मुख्यमंत्री होणार का?; NCP कार्यालयाबाहेरच्या पोस्टरवर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवारांनीच पहिल्यांदा शिवसेना फोडली; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा गंभीर आरोप

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा…अजित दादा; अजित पवारांच्या होर्डिंग्जमुळे चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here