Home महाराष्ट्र भावी मुख्यमंत्री होणार का?; NCP कार्यालयाबाहेरच्या पोस्टरवर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भावी मुख्यमंत्री होणार का?; NCP कार्यालयाबाहेरच्या पोस्टरवर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे होर्डिंग झळकले होते. त्यांच्या होर्डिंगवर ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांंचे होर्डिंग झळकले आहेत.

या होर्डिंगवर “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा, एकच वादा अजित दादा”, असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : शरद पवारांनीच पहिल्यांदा शिवसेना फोडली; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा गंभीर आरोप

काही उत्साही कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून बॅनर लावले, पण 145 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही, असं अजित पवार म्हणाले. तसेच असे पोस्टर लागले असतील तर त्याला मनावर घेऊ नका, फार महत्त्व देऊ नका. उद्या जर मी तुमचं होर्डिंग लावलं, तरी 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या होर्डिंग लावण्याला काहीही अर्थ नाही. हे फक्त कार्यकर्त्याचं वैयक्तिक समाधान असतं, असं उत्तर अजित पवारांनी यावेळी दिलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा…अजित दादा; अजित पवारांच्या होर्डिंग्जमुळे चर्चांना उधाण

मोठी बातमी; निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा पाठिंबा

…त्यामुळे माझाही, विनायक मेटे करण्याचा डाव; अशोक चव्हाणांच्या दाव्याने खळबळ