आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे एनडीएच्या खासदारांची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते.
एनडीएच्या पार पडलेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा उल्लेख करत आपली भूमिका मांडली.उद्धव ठाकरे आणि आमची युती ही खूप मजबूत होती. पण आम्ही त्यांना दूर केलं नाही तर ते आमच्यापासून दूर गेले, असं नरेंद्र मोदी बैठकीत म्हणाले.
ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंकडे नेतृत्व दिलं पाहिजे, तरच…; या नेत्याचं मोठं विधान
विशेष म्हणजे या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा दाखला दिला. त्यांनी एनडीएच्या खासदारांसमोर हा दाखला दिला. यावेळी त्यांनी खासदारांना यापुढेही एनडीए म्हणून कायम राहण्याचं आवाहन केलं.
दरम्यान, या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? विजय वडेट्टीवर यांची प्रतिक्रिया,म्हणाले…
“दादर हादरलं, धावत्या ट्रेनमधून तरूणीला खाली फेकलं, आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात”
“ठाकरे गट-मनसे युती होणार?; उद्धव ठाकरे, लवकरच राज ठाकरेंना फोन करणार?”