आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : अखेर महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने अखेर दिला. या निकालात शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळालं असून राज्यातील शिंदे सरकार वाटलं आहे.
मात्र, शिवसेनेचा ताबा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. कारण विधानसभेत विश्वासमत ठरावाच्या मतदानावेळी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद बनवणं अवैध आहे., असं न्यायालयानं म्हटलं आहे. कोर्टाच्या या निकालामुळे शिवसेनेचा ताबा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. शिवसेना कुणाची? याबाबतचा निर्णय येणे अजून बाकी आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाचा निर्णय पलटवूही शकते. कारण गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती करताना विधानसभा अध्यक्षांनी लेजिसलेटिव्ह पार्टीच्या बेसिसवर ही नियुक्ती केली. राजकीय पक्ष म्हणून निर्णय दिला नाही. तोच प्रकार शिवसेनेचा ताबा देताना झाला आहे. तुम्ही लेजिस्लेचर पार्टीच्या बेसिसवर निर्णय दिला. तुम्ही सर्व अॅफिडेव्हिट चेक करायला हवे होते, असं सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला म्हणू शकतं. सर्वोच्च न्यायालय आयोगाचा निकाल पलटवूही शकतं. पक्ष परत उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो. ती शक्यता आहे, असं सिद्धार्थ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
सुप्रीम कोर्टाचा ठाकरेंना मोठा धक्का; राज्यात शिंदे सरकार कायम राहणार
…आणि शिंदें सरकार कोसळेल; नाना पटोलेंच मोठं वक्तव्य
सत्तासंघर्षाच्या निकालाआधी, विधानसभा उपाध्यक्षांचा, 16 आमदारांबाबत मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…