आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. या हल्यात जखमी झालेल्या रोशनी शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्पितळात जाऊन भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट, भाजप तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी, फडणवीसांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख करत गृह मंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत एक मोठं विधान केलं आहे.
फडतूस या शब्दावरून पेटलेल्या राजकारणावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, इतकं सगळं करून ही तुम्ही (उद्धव ठाकरे) बाहेर आहात. याचं एकच कारण आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव, असं राणे म्हणाले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीची मोठी खेळी; शिवेंद्रराजेंना टक्कर देण्यासाठी भाजपचा ‘हा’ नेता हाती बांधणार घड्याळ”
“उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांवर जास्त बोलू नये तसेच टीका टिप्पणी करून नये, त्यांनी जर पाठ फिरवली आणि बोट दाखवलं, तर उद्धव ठाकरेंचं योग्य जागी (तुरुंगात) जाणं होईल”, असा इशारा राणेंनी यावेळी दिला. त्यामुळे राणेंच्या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंना अटक होणार का?; याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू झाली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी
भाजप आणि शिंदे गटात नाट्यनाराजी; ‘या’ भाजप खासदाराने जाहीरपणे व्यक्त केली खंत
महाराष्ट्रातलं गृहखातं कुणाच्या दबावाखाली? आदित्य ठाकरेंचा सवाल
मुख्यमंत्री म्हणायचे की गुंड मंत्री? आता नवीन ‘गुंड’ खाते तयार करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल