आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि उद्धव ठाकरेंनी राजिनामा दिला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले आहेत.
उद्धव ठाकरे हे विधानभवनात येणार अशी चर्चा कालपासूनच रंगली होती. अखेर उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत आ. आदित्य ठाकरे हे एकाच वेळी विधानभवनात दाखल झाले होते.
हे ही वाचा : गणेश चतुर्दशीनंतर मनसेची तोफ राज्यभर धडाडणार; राज ठाकरे घेणार राज्यभर सभा आणि मेळावे
आगामी काळात महापालिकासह पंचायत समिती, नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याअनुशंगाने महाविकास आघाडीची महत्वाची बैठक ही विधान भवनात झाली. त्या बैठकीलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहिले. या बैठकीला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे नेते उपस्थित होते.
दरम्यान, उद्धव ठाकरे दाखल होताच उपस्थितांनी घोषणा देण्यास सुरवात केली होती. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रथमच विधानभवनात आल्याने एक वेगळाच माहोल बनला होता.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेनेकडून हकालपट्टीचं सत्र सूरूच; आता आणखी 2 बंडखोर आमदारांची ठाकरेंकडून हकालपट्टी
राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त खोक्याचीच भाषा कळते; शिंदे गटाची टीका
राज-उद्धव एकत्र येणार का?; बाळा नांदगावकर यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…