शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी ज्यांनी हात वर उचलले होते त्यांचे खांदे निखळले- उद्धव ठाकरे

0
581

मुंबई : शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी ज्यांनी हात वर उचलले होते त्यांचे खांदे निखळले आहेत. असं म्हणत शिवसेनेने सामना अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात समाधान आनंदाचं वातावरण आहे. कारण महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री लाभला आहे, असं सामना अग्रलेखातून शिवसेनेनं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून एका शिवसैनिकास बसवेन, असा शब्द उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना दिला होता. हा शब्द त्यांनी पूर्ण करून दाखवला आहे. असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94वी जयंती असून शिवसेनेनं एक मेळावा आयोजित केला आहे. शिवसेनेचा ‘वचनपूर्ती जल्लोष’ सोहळा बीकेसीत होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाहीत- पंकजा मुंडे

‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठ निर्णय

शिवथाळी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्डाची सक्ती

त्या व्हिडीओशी भाजपचा काहीही संबंध नाहीये- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here