Home महाराष्ट्र शिवथाळी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्डाची सक्ती

शिवथाळी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्डाची सक्ती

मुंबई :  महाविकासआघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवथाळी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. तसंच ही थाळी खाणार्‍यांचा फोटोही काढला जाणार आहे. फोटो जुळला, तरच ग्राहकाला 10 रुपयात शिवथाळी मिळणार आहे.

26 जानेवारीपासून राज्यात ‘शिवथाळी’ उपलब्ध होणार आहे.  ही योजना राबवताना बोगस लाभार्थी दाखवले जाऊ नयेत यासाठी राज्य सरकारकडून आधार कार्ड आणि फोटो काढण्याची अट घालन्यात आली आहे.

शिवसेनेच्या संकल्पनेतूनच १० रुपयात थाळी ही योजनाही सुरू केली जात असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे आहे.

दरम्यान, ही योजना गरिबांना केंद्रस्थानी ठेवून सुरु करण्यात आली आहे. योग्य व्यक्तींना योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. त्यामुळेच थाळी मिळवण्यासाठी आधार कार्ड दाखवण्याची अट घालण्यात आली आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

त्या व्हिडीओशी भाजपचा काहीही संबंध नाहीये- चंद्रकांत पाटील

पुस्तक झालं आता व्हिडीओ हे अशोभनीय; संभाजीराजे भडकले

हा तानाजी मालुसरेंचाअपमान शिवरायांवर प्रेम करणारी जनता खपवून घेणार नाही- सुप्रिया सुळे

रोहित पवारांनी फडणवीसांवर केलेल्या टँकर घोटाळ्याची चौकशी होणार