तीन पक्षांचं सरकार असतानाही नेतृत्व कसं करावं हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं- बाळासाहेब थोरात

0
458

मुंबई : लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत आयएनएस आणि सी-व्होटर्सने देशपातळीवर एक सर्व्हे केला. लोकप्रिय 5 मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश करण्यात आला आहे. यावरून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरेंच्या कामकाजाचं कौतुक केलं आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्या 5 मध्ये आहेत, खरं म्हणजे ही गोष्ट आमच्याकरीता आणि महाराष्ट्र राज्याकरिता अभिमानास्पद आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरें स्तुतीसुमनं उधळली आहेत.

तीन पक्षांचं सरकार असतानाही नेतृत्व कसं करावं हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं आहे. वेगवेगळी विचारधारा ज्यावेळी एकत्र आहेत, असं असतानाही उद्धव ठाकरे यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत, असं थोरात यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आशिष शेलार यांनी मानले संजय राऊत यांचे आभार; म्हणाले…

करोना रूग्णांची आकडेवाडी कमी दाखवून फायदा नाही; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्रावर विठू माऊलींचे आशीर्वाद आणि मुंबा देवीची कृपा, म्हणून निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here