Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यने माझा ताण बराच कमी केला; आता अतुल भातखळकर...

उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यने माझा ताण बराच कमी केला; आता अतुल भातखळकर म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नववर्षाच्या मुहू्र्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा करत मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. आजारपणानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच फेसबुक लाईव्ह येत मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ करत असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले चिरंजीव आदित्य ठाकरेंचं विशेष काैतुक केलं.

हे ही वाचा : विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रशिक्षक राहुल द्रविडचं मोठं विधान, म्हणाले…

मीसुद्धा रस्त्याची कामे मध्यरात्री जाऊन पाहिली. नालेसफाईची कामे नाल्यात उतरून पाहिली. दहीसर नदीचे काम असो की अजून काम. हा माझा पूर्ण ताण आता आदित्यने कमी केला आहे. तो रात्री, अपरात्री सर्वांसोबत नगरसेवक, महापालिका अधिकाऱ्यांसोबत बाहेर जातो. कामांची पाहणी करतो, असं काैतुक उद्धव ठाकरेंनी केलं. यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली.

आदित्य ठाकरे यांच्यामुळे उपनगरातील लोकांचं टेंशन वाढलं आहे. तौत्के, निसर्ग चक्रीवादळ आलं, लोकांच्या घरात पाणी शिरलं तरी आदित्य ठाकरे एकदाही फिरकले नाहीत. एक मात्र नक्की की तुमच्या पावलावर पाऊल ठेवत ते देखील मंत्रालयात पाऊल ठेवत नाहीत. जनप्रतिनिधी हे तुमचं टेन्शन कमी करण्यासाठी नाही तर जनतेचं टेन्शन कमी करण्यासाठी असतात. त्यामुळे तुमचं टेन्शन कमी झालं असलं तरी जनतेचं टेन्शन वाढलंय हे नक्की, असा हल्लाबोल भातखळकरांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

“…म्हणून रोहित पवारांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार”

प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से; चित्रा वाघ यांचा टोला

“काँग्रेसचा मोठा डाव, 6 दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ आमदाराची पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी”