आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोरगरीबांच्या मुलांचं काहीच पडलेलं नाही. त्यांना फक्त आपल्याच मुलाची काळजी आहे. त्यांनी आपल्या मुलाला मंत्री केलं. आमच्या गरिबांच्या लेकराचं काय?, असा सवाल भाजप नेते, आमदार राम सातपुते यांनी केला आहे. ते टीव्ही9 मराठीशी बोलत होते.
हे ही वाचा : ममता बॅनर्जींनी दिला ‘जय मराठा, जय बांग्ला’ चा नारा; केली उद्धव ठाकरे लवकर बरे होण्याची देवाकडे प्रार्थना
महाराष्ट्र सरकारला गोरगरीब मुलांचं काहीही पडलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला मंत्री केलं. पण गोरगरिबांच्या मुलांच्या नोकरीची काळजी त्यांना नाही. गोरगरिबांच्या चुलीत पाणी टाकायचं ही राज्य सरकारची भूमिका आहे, असं राम सातपुते यांनी म्हटलं आहे.
तरुणांच्या पिढ्या बरबाद करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे. या पेपरफुटी प्रकरणातील दलाल हे सरकारचे दलाल आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचं निलंबन केलं पाहिजे. चौकशी केली पाहिजे. भरतीमध्येही वाझे वसुली करणार हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. चांगलं केलं की आम्ही केलं. वाईट झालं की केंद्रान केलं. आर्मी इंटेलिजन्सचा अभिनंदन करण्याचा प्रस्ताव ठेवावा, असंही राम सातपुते म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपा-शिवसेना यांच्यात पुन्हा मैत्री होणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…
मनसेत जोरदार इनकमिंग; बीडमध्ये अनेक युवकांच्या हाती मनसेचा झेंडा
सांगली जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचं वर्चस्व; उपाध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला?