उद्धव ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र; त्यांना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही- संजय राऊत

0
138

मुंबई : हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्या कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली?, असं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांचा आत्मा आणि मन हिंदुत्वानं ओतप्रोत भरलेलं आहे. त्यामुळं त्यांना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही, असं संजय राऊत यांनी राज्यपालांच्या पत्राला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, तसेच ठाकरे सरकार लोकनियुक्त आहे आणि राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळं सरकार घटनेनुसार चालत आहे की नाही तेवढंच पाहा, असंही संजय राऊत यांनी राज्यपालांना म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नाथाभाऊंना राजकारण नीट समजते, ते योग्य निर्णय घेतील- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादीचं ठरलं! बिहार निवडणुकीत शिवसेनेशी युती नाही

“माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही”

उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं; झोपेत असलेल्या 3 बहिणींवर अ‍ॅसिड हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here