“उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा; ‘या’ खासदाराचं मोठं विधान”

0
275

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा होती. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधला.

आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात निवडणूक लढवावी, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : चेंजिंग रूममधील व्हायरल व्हिडिओनंतर, गाैतमी पाटील पहिल्यादांच आली समोर, म्हणाली…

उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं विधान संजय राऊत यांनी यावेळी केलं. राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे. महाविकास आघाडीने ठरवलं होतं की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू… आज विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात., असं राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“कोकणात उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार?; ‘हा’ मोठा हाती बांधणार शिवबंधन”

तुमच्यावर हल्ला कसा झाला?; संदीप देशपांडेंनी सांगितला सविस्तर घटनाक्रम, म्हणाले…

मुख्यमंत्र्यांचा काँग्रस, राष्ट्रवादीला मोठा धक्का; तब्बल 41 जणांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here