आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी 25 वर्ष युतीत सडलो, अशी टीका केली होती. त्या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनि प्रत्युत्तर दिलं आहे. सोमवारी ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेल्यामुळे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. आपल्या पक्षाचा ऱ्हास होताना पाहून आलेली निराशा लपविण्यासाठी ते भारतीय जनता पार्टीवर टीका करून थयथयाट करत आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार; अण्णा हजारेंची अमित शहांकडे चौकशीची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण हे आधीच्या दसऱ्याच्या भाषणासारखेच होते. एखाद्या माणसाला आपली चूक समजली पण मान्य करता येत नसेल तर निराशेतून तो थयथयाट करतो आणि दुसऱ्याला चूक म्हणतो तसा प्रकार उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडला. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेली. तब्बल 41 नगरपंचायतींमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. या निराशेतून सोडणार नाही, दाखवून देईन, आमच्या जिवावर तुम्ही मोठे झालात असे मुख्यमंत्री बोलत आहेत. पण मुख्यमंत्र्याच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
‘…तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी’; संत एकनाथ मंदिराच्या खासगीवरून मनसे आक्रमक
“मिरच्या झोंबल्या, बांबू लागला, म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला ना?”