Home महत्वाच्या बातम्या सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार; अण्णा हजारेंची अमित शहांकडे...

सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार; अण्णा हजारेंची अमित शहांकडे चौकशीची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. अण्णा हजारे यांनी गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक पक्षातील लोक आणि अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने संगनमताने विकत घेतले. या व्यवहारात अंदाजे 25 हजार कोटी रूपयांचा घोटाळा करण्यात आला आहे, असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.

हे ही वाचा : “पराभवाच्या धक्क्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त झालेत, म्हणूनच तर त्यांना गावगुंड व पंतप्रधानांमधला फरक कळत नाहीये”

तत्कालीन सत्ताधारी पक्षांनी आणि राजकारण्यांनी अनेक सहकारी साखर कारखान्यांची व्यवहारिकता न तपासता मंजुरी दिली. महाराष्ट्राच्या साखर आयुक्तांनी 2015-16 च्या मंत्री समितीला सादर केलेल्या अहवालानुसार, सध्या राज्याचे साखर उत्पादन 7 कोटी मेट्रिक टनांपेक्षा जास्त नसतानाही 9.30 कोटी मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्यांना परवानगी देण्यात आली, असा आरोपही अण्णा हजारे यांनी केला आहे.

अण्णा हजारे यांनी अमित शाहा यांना लिहिलेल्या पत्रातून सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘…तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी’; संत एकनाथ मंदिराच्या खासगीवरून मनसे आक्रमक

“मिरच्या झोंबल्या, बांबू लागला, म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला ना?”

“रूपाली पाटील ठोंबरे यांच्यावर राष्ट्रवादीने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”