आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ‘लोकसत्ता’च्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आय़ोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं.
ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही, असं विरोधी पक्षातील नेते वारंवार म्हणत आहेत, यावर आपली प्रतिक्रिया काय?, असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरेंनी कोणाच्याच म्हणण्याला काही अर्थ नसतो. मला त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं, आमच्यावर कोणी राजकारण लादलेलं नाही. घरात जन्मापासून वारे वाहतात ते अंगात भिनतात. बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितलं की, तू माझा मुलगा आहेस म्हणून शिवसेना आणि शिवसैनिकांवर लादणार नाही. शिवसैनिक आणि जनतेनं स्वीकारलं तर पुढं जा. आता आदित्य त्याच्या वाटेनं पुढं जातोय, लोकांना विचार पटतोय, लोकं स्वीकारतील., असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : “मनसेचा वर्धापन सोहळा यावेळी पहिल्यांदाच मुंबईबाहेर, ‘या’ ठिकाणी होणार मनसेचा वर्धापन सोहळा”
देश आणि राज्य अशी विभागणी होत नाही. आवाज कुणाचा तोच आहे, त्यातला खणखणीत पणा तोच आहे. दाबला जाणार नाही. पिढीप्रमाणं थोडासा बदल होतो, तो स्वीकारला पाहिजे. मी शिवसेनाप्रमुखांचं विचार सोडले नाहीत आणि कधी सोडणार नाही, हे विचार आजोबांपासून आहेत. जनतेची सेवा करणारी आमची सहावी पिढी आहे. आमचे पूर्वज धोडपचे किल्लेदार होते. माझ्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे भाषण करता येत नाही, अशी टीका झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं भाषण करता येत नाही पण प्रत्येक काळ असतो. बाळासाहेब ठाकरेंचा काळ मूर्ती बनवण्याचा काळ होता. मूर्ती बनल्यानंतर शिल्पकारांचा मुलगा त्यावर घण घालत बसला तर मूर्ती तुटेल.मूर्ती झाल्यावर त्याच्यावर फुलं वाहायची असतात. वडिलांनी मूर्ती बनवण्यासाठी घेतल्या कष्टानंतर त्यावर फुलं वाहायला पाहिजेत., असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपसोबत पुन्हा युती होणार का; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
किरीट सोमय्या भावा, माझे गाळे मला परत कर; किशोरी पेडणेकरांचा टोला
चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रिया सुळेंना CM करण्याच्या हालचाली सूरू, आता सुप्रिया सुळे म्हणतात…