उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही- नारायण राणे

0
154

मुंबई : कालच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे पितापुत्रांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने शैलीने विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद आहेत. त्यांच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची आब राखली. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या लायकीचे नाहीत, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीसांबाबत असं बोलणं योग्य नाही- रोहित पवार

मुंबई आणि महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कंगणावर हल्लाबोल

“पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत”

“विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here