आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सूरू आहे. यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात जोरदार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत.
यानंतर सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना दिशा सालियान मृत्यूप्रकरणी लक्ष्य केलं. या आरोपांनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली. यानंतर आता शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता अॅक्शन मोडवर आले आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.
भात्यात असलेले सगळे बाण घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत नागपुरात मोठा बॉम्ब फोडणार असल्याचा गाैफ्यस्फोट संजय राऊतांनी यावेळी केला.
हे ही वाचा : शरद पवार खरंच नाराज आहेत का?; उत्तर देताना अजित पवार पत्रकारांवरच भडकले, म्हणाले…
उद्धव ठाकरे यांच्यासोबत नागपुरला आहे. नागपुरला गेल्यावर आम्ही मोठे मोठे बॉम्ब फोडणार आहोत. हा माहौल कुणाला मिळेल का? हा जिवंतपणा, हा उत्साह मिळेल का? असे वाटते आपण लढाईला चाललो. वाघाचे काळीज असलेली शिवसेना आहे, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, अलीबाबा आणि 40 चोर हा संपणार आहे. फेब्रुवारी महिना शिंदे सरकार बघणार नाही. 40 गेले असले तरी आपले 140 आमदार निवडून आणायचे आहेत. आजपासून शिंदे सरकारची झोप उडेल, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता, वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले…
“अजित पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्यानं घेतली, राधाकृष्ण विखे पाटलांची भेट, चर्चांना उधाण”
“कोल्हापूरमध्येही मनसेचा भगवा फडकला, उखळू ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात”