पुणे : उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. लोकमत आयोजित पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान मोदींची तुलना शिवरायांशी केल्याने संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. टीका करताना संजय राऊतांनी ट्विट करत शिवरायांचे वंशज कुठे आहेत? असा सवाल केला होता. मंगळवारी पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी राऊतांना चांगलंच धारेवर धरलं होतं. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
कोणत्याही प्रसंगाला मी हिंमतीने सामोरे जातो. त्यामुळे समोर कितीही मोठा माणूस असू द्या त्याला मी घाबरत नाही. हिंमत असेल तर माझ्यावर अंगावर या, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षला जेव्हा नाव दिलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला केला होता.
महत्वाच्या घडामोडी-
“उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत सरळ शब्दात उद्धवची आणि संज्याची औकात काढल्याबद्दल त्यांच अभिनंदन”
“मुलाच नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?”
शिवसेना पक्षला जेव्हा नाव दिलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना; ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय