Home पुणे पुण्यातील हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पुण्यातील हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : माजी मंत्री व शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल पुण्यात झाला. या हल्य्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. यावरून आता स्वत: उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया देत नेमकं काय घडलं, याबाबतची माहिती दिली.

परमेश्वराचे, मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर आशीर्वाद आहेत म्हणून मी सुखरुप वाचलो. हा प्रकार निंदनीय आहे, असं उदय सामंत म्हणाले.

हे ही वाचा : एक दिवस आदित्य ठाकरे तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही; ‘या’ आमदाराचा बंडखोरांवर हल्लाबोल

पोलिसांकडील सीसीटीव्ही फुटेजमधून तुम्हाला वस्तुस्थिती समजेल. आम्ही तानाजी सावंत यांच्या घरी जात होतो. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा पुढे गेला होता. त्यानंतर सिग्नल लागले. मी कोणाचाही ताफा फॉलो करत नव्हतो. सिग्नल लागल्यामुळे मी नियमाप्रमाणे थांबलो होतो. यावेळी माझ्या बाजूला दोन गाड्या आल्या. त्यांच्या हातात जे होते, त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. बाजूला 50 ते 60 शिवसैनिक होते. मात्र शिवसैनिकांनी काहीही केलेले नसून फक्त 12 ते 15 लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला,  असं उदय सामंत यांनी सांगितलं.

दरम्यान, जो प्रकार घडला त्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. त्यांच्याकडे शस्त्रे कशी आली. त्यांच्या हातात दगड कसे आले. त्यांना माझ्या गाडीचा नंबर कसा समजला, याचा तपास केला पाहिजे. ते मला शिव्या घालत होते. या घटनेतून मी वाचलो हे परमेश्वराचे, मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर आशीर्वाद आहेत. परंतु झालेला प्रकार निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदेंचा मनसेला मोठा धक्का; माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांचा शिंदे गटात प्रवेश

काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार, शिवसेना कधीच सोडणार नाही; ‘या’ माजी आमदाराची ग्वाही

अशोक चव्हाण खरंच काँग्रेस पक्ष सोडणार?; स्वत: चव्हाणांनी दिलं उत्तर, म्हणाले…