मुंबई : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेण्यावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवरायांचे योगदान काय? 105 हुतात्मे मुंबईसाठी झाले हे चूक असून ते प्लेगने मरण पावले अशी मुक्ताफळे ते उधळतील. अशी विधाने करणाऱ्यांना हुतात्मा स्मारकाच्या बाजूला खांब उभारून त्यास बांधून ठेवायला हवे. इतके निर्लज्ज लोक महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्राशीच बेईमानी करतात हे कसे सहन करायचे? असा सवाल करत शिवसेनेने टिका केली आहे.
गांधीनगरला हलविण्यात आलेल्या आर्थिक केंद्राबाबत तांत्रिकदृष्टय़ा गुजरातचे बरोबर असेलही, पण दिल्लीत मोदी सरकार असल्यामुळेच गुजरातला झुकते माप मिळत आहे. मुंबईतल्या अनेक वित्तीय संस्था, उद्योग-व्यापार गुजरातला हलवून महाराष्ट्राचे मोठे नुकसान केलेच आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
उद्धवजी हे नाव जगात गर्जत राहणार.. ; मुख्यमंत्र्यांच पत्राद्वारे कौतुक
IFSC सेंटर मुंबईतच ठेवा, अन्यथा…; शरद पवारांचा मोदींना इशारा
भाजपाने रडीचा डाव खेळू नये; जयंत पाटलांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर
निवडणुकी आधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं सगळं ठरलं होतं- देवेंद्र फडणवीस