Home नागपूर “आजचा पराभव हा तर नाना पटोलेंचा पराभव, त्यांच्या मोगलाईमुळंच काँग्रेसचा पराभव झाला”

“आजचा पराभव हा तर नाना पटोलेंचा पराभव, त्यांच्या मोगलाईमुळंच काँग्रेसचा पराभव झाला”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : नागपूर आणि अकोला-वाशिम विधानपरिषद मतदारसंघाचा निकाल आज जाहीर झाला असून या दोन्ही जागांवर भाजपने जोरदार विजय मिळवला आहे.

हे ही वाचा : महाविकास आघाडी सरकार पडेल, असं वाटत नाही; राज ठाकरेंचं मोठं विधान

नागपूर विधानपरिषद जागेसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. यानंतर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला.

आज झालेला आपला विजय हा नाना पटोलेंचा पराभव आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं घोडेबाजार केला आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर बावनकुळे यांनी दिली. तसेच मी सर्वांचे आभार मानतो. या निवडणुकीत नाना पटोले आणि महाविकास आघाडीने पैशांचा अक्षरशः घोडेबाजार मांडला होता. त्यांनी पदाचा गैरवापर केला. नाना पटोले यांच्या मोगलाईमुळेच काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला., अशी टीका बावनकुळेंनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच नंबर एकचा पक्ष असेल- देवेंद्र फडणवीस

मी दिल्लीतच आहे, माझ्यावर कारवाई करा; खासदार संजय राऊत यांचं खुलं आवाहन

“काँग्रेस पक्षाला स्वत:ची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचे नेतृत्व काय करणार?”