Home महाराष्ट्र औरंगाबादेत राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय; जिल्हाध्यक्षांना पदावरुन काढलं!

औरंगाबादेत राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय; जिल्हाध्यक्षांना पदावरुन काढलं!

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये राज ठाकरेंनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांना तडकाफडकी पदावरून काढण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी या बाबत निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यात ही कारवाई झाली आहे. या पार्श्वभूमीवर दाशरथे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलं आहे.

हे ही वाचा : “आजचा पराभव हा तर नाना पटोलेंचा पराभव, त्यांच्या मोगलाईमुळंच काँग्रेसचा पराभव झाला”

राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर शहरभर झळकले. यामध्ये आघाडीवर होते ते मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे. राज ठाकरे यांचे संभाजी नगरीत स्वागत या आशयाचे बॅनर संपूर्ण शहरभर लावले होते.मात्र त्यांच्याच या दौऱ्यात दाशरथेंवर मोठे आभाळ कोसळलं आहे.

दरम्यान, कुठलीही पूर्वकल्पना नसतांना दाशरथे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे. मात्र याबाबतचे कारण अजून पर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडी सरकार पडेल, असं वाटत नाही; राज ठाकरेंचं मोठं विधान

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच नंबर एकचा पक्ष असेल- देवेंद्र फडणवीस

मी दिल्लीतच आहे, माझ्यावर कारवाई करा; खासदार संजय राऊत यांचं खुलं आवाहन