मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी कारवाई करण्यात आली. त्यावर संताप व्यक्त करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही. मराठी माणसानं उद्योग करणं, महाराष्ट्रात व्यापार करणं हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देशात इतर काही काम नसेल. घोटाळा करुन लोक देशाबाहेर पळत आहेत. एका वर्षात लोकांची संपत्ती वाढत आहेत्यांची ईडी चौकशी करणार नाही. पण महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मला नोटीस देण्याबद्दल कोणी बोलत असेल तर येऊ देत, असं संजय राऊत यांनी म्हणाले.
दरम्यान, हे सूडाचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू,” असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी-
अहमद पटेल यांनीआयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली; पंतप्रधान मोदींनी अर्पण केली श्रद्धांजली
काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन
“भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र शिवसेनेने त्यांची जात दाखवली”
सत्ता गेल्याची निराशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळेच…; शरद पवारांचा भाजपवर घणाघात