मुंबई : ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या वादानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देतबळाचा वापर करून जर आंदोलन चिरडले तर त्याचे परिणाम गंभीर होतील, असं म्हटलं होतं त्यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
2011 साली मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार करून 3 शेतकऱ्यांना ठार करणारे, आज केंद्र सरकारला सांगतायत की बळाचा वापर करू नका, असं म्हणत प्रविण दरेकरांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
दरम्यान, दिल्लीत बळाचा वापर झाला असता, तर तिथे पोलीस जखमी झालेच नसते, असंही प्रविण दरेकर यांनी यावेळी म्हटलं आहे.
२०११ साली मावळमध्ये शेतकऱ्यांवर
गोळीबार करून ३ शेतकऱ्यांना ठार करणारे,
आज केंद्र सरकारला सांगतायत की बळाचा वापर करू नका!
दिल्लीत बळाचा वापर झाला असता, तर तिथे पोलीस जखमी झालेच नसते.@BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/McxoAvYJjw— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 27, 2021
महत्वाच्या घडामोडी-
…तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही- उद्धव ठाकरे
“शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का?”
शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?- आशिष शेलार
“काँग्रेस मोदींचा तिरस्कारापोटी शेतकऱ्यांच्या आडून देशात हिंसाचार करत आहे”