मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तान फाळणीचा दिवस हा स्मृती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून प्रतिक्रिया दिली आहे.
फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की, स्मृतींना तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा, असा सवाल सामनात केला आहे. तसेच फाळणी ही वाईटच होती. फाळणीच्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बिजे रोवली जाऊ नयेत, असा सल्लाही सामनातून यावेळी दिला.
दरम्यान, फाळणीच्या वेदनेचा दाह फक्त ‘उक्ती’ने शमणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष ‘कृती’देखील करावी लागेल. विद्यमान सत्ताधारी ती करणार आहेत काय? देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचा उत्सव वर्षातून एकदा साजरा होतो, पण फाळणीची वेदना सदैव मन जाळीत असते. ही आग कशी विझवणार?, असा प्रश्नही सामनात यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी”
लायकीत रहायचं नाहीतर पुण्यात फिरणं अवघड करू; मनसेचा संभाजी ब्रिगेडला इशारा
“नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही”
जेवढ्या उंचीची आहे मी, तेवढीच लायकी ठेवा; पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या