आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगोला : मनसेच्या दादरमधील शिवाजी पार्कवरच्या दीपोत्सवात मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले. तेव्हापासून युतीच्या चर्चा होत आहेत. त्यावर आता शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
माझ्या मतानुसार मनसेसोबत युती करण्यास कोणतीही अडचण नाही. तिन्ही पक्षांचा मुख्य अजेंडा आणि बेस हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे एका आधारावर या तिन्ही नेत्यांना एकत्र येण्यासाठी राजकारणात मला कोणतीही अडचण वाटत नाही, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यावेळी ‘काय शिंदे-फडणवीस सरकार, काय सणासुदीचे दिवस अन् काय तो महाराष्ट्रात जिकडं तिकडं आनंदी आनंद’, अशी डायलॉगबाजी करत शहाजी बापू पाटील यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का?; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले..
“आधी नाही म्हणाले, रागावले, चिडले, नंतर राज ठाकरेंनी जी कृती केली, त्याने सर्वांची मने जिंकली”
सांगलीत भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे…