Home महाराष्ट्र “छत्रपतींचा पुतळा उभा करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं नव्हे, तर त्यांच्या आदर्शावर...

“छत्रपतींचा पुतळा उभा करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं नव्हे, तर त्यांच्या आदर्शावर चला”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अमरावतीत शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवला. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ठाकरे सरकारला टार्गेट केलं. यावरून आता शिवसेना खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली .

शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण नको. छत्रपतींचा पुतळा उभा करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं नव्हे, त्यांच्या आदर्शावर चाला, असा उपरोधक सल्ला अरविंद सावंत यांनी राणे दाम्पत्यांना यावेळी दिला.

हे ही वाचा : ‘…यामुळे किरण माने यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला’; किरण माने प्रकरणवर मनसेची प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही सगळेच आराध्य दैवत म्हणतो. आपली त्यांच्याबद्दलची आदराची भावना समोर ठेवताना ते आदर्श राजेही होते. अशा राजांना परवानगी न घेता कुठेही बसवणे योग्य नाही. पुतळ्याला कुणी काही केलं असतं तर चाललं असतं का. बाकी राजकीय सोडा, छत्रपतींच्या नावाने आलेलं सरकार वगैरे हे कुणी शिकवण्याची गरज नाही. कारण आम्ही जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत आलो आहोत, असंही सावंत यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा घुमू लागल्या. मात्र अमरावती महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे, मग पुतळ्याला परवानगी तर पालिकेने नाकरली, मग त्यानंतरही राणांच्या टार्गेटवर पुन्हा उद्धव ठाकरे का? मग या पुतळ्यामागचे राजकारण काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“राष्ट्रवादीचा भाजपला दणका, अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

भाजपची सत्ता असणाऱ्या पालिकेनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी नाकरली; नवनीत राणांची ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी

अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचा उल्लेख मुख्यमंत्री, नंतर केला खुलासा, म्हणाले…