Home महत्वाच्या बातम्या उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं म्हणजे…; जयंत पाटलांची भाजपावर टीका

उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं म्हणजे…; जयंत पाटलांची भाजपावर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरात भाजपनं जल्लोष केला. महाराष्ट्र भाजपनेही प्रदेश कार्यालयाबाहेर जोरदार सेलिब्रेशन केलं. अशातच भाजप नेत्यांकडून आगामी निवडणुकीत महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे.यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

हे ही वाचा :  मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; पालकमंत्र्यांना दिला इशारा

उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं चुकीचे आहे. महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धोका नाही.  तसचं ,उत्तर प्रदेशमध्ये मायावतींना मतं अधिक पडली आहेत. सर्व पक्ष उत्तर प्रदेशमध्ये एकवटले असते तर विजय झाला असता, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करायला हरकत नाही परंतु भाजपामधील लोकांवरही कारवाई व्हावी. आम्ही भाजपाची यादी दिली आहे कारवाई व्हावी.” असं जाहीर आव्हानही जयंत पाटील यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“जोतिबा मंदिराचा ई-पास बंद करण्यासाठी, ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवून, मंदिरासमोर आंदोलन”

“राजकीय वातावरण तापलं, शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला, तर फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, चर्चांना उधाण”

आगामी मुंबई महापालिकेत महापाैर भाजपचा, तर उपमहापाैर रिपाईचा असणार- रामदास आठवले