मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र यांच्यासोबत बंददाराआड चर्चा, तसेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतलेली भेट या सर्वांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.
आमची इच्छा आहे की, महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे तीन मुख्यमंत्री येत्या काळात झाले पाहीजेत. कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार आहे, असा टोला रावसाहेब दानवेंनी नाना पटोलेंना यावेळी लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, येत्या काळात शिवसेना-भाजप एकत्र निवडणुक लढणार का?, असा प्रश्न दानवेंना विचारण्यात आला. यावर दानवेंनी, 2024 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याचं म्हटलं. तसेच राजकीय मतभेद आहेत, मतभेद नाही म्हणून मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच स्वागत केलं. त्यावेळी दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं दानवेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
मराठा आरक्षणाला वंचितचा पाठिंबा! मराठा मोर्चात आता प्रकाश आंबेडकर स्वत: उतरणार”
“टाक खंडणी बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेनं राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावं”
“आंदोलन करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं, पण…”
“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल”