आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. रूपेश मोरे, असं वसंत मोरेंच्या मुलाचं नाव आहे.
रूपेश मोरेच्या नावानं बनावट विवाह प्रमाणपत्र बनवून 30 लाख रूपयांची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी मोरे यांनी भारती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच याविषयी मोरे यांनी प्रतिक्रिया देत घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
हे ही वाचा : “महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट?; होळीच्या दिवशीच फडणवीसांची, ठाकरेंना साद, पुन्हा एकत्र येणार?”
7 फेब्रवारीपासून माझा मुलगा रूपेशला व्हॉट्सअॅपवर चॅटिंग केलं जात होतं. त्याचं बोगस लग्नाचं प्रमाणपत्र तयार करून 30 लाख रुपयांची खंडणी मागितली गेली. चार-पाच दिवस हा प्रकार सुरु राहिला. नंतर बंद झाला. त्यासंदर्भात भारती पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. पण, 27 फेब्रुवारीपासून पुन्हा रोज मेसेज सुरू झाले., असं मोरे म्हणाले.
यापूर्वीचे नंबर महाराष्ट्रातील नसल्याने काळजीचे कारण वाटलं नाही. परंतु, आताचे मेसेज येणारे पाच-सह नंबर महाराष्ट्रातील आहे. आमचं फार्महाऊस नावावर कर नाहीतर, तुझं सर्व व्हायरल करू अशा धमक्या दिल्या जात आहेत. विवाहाचे तयार केलेलं प्रमाणपत्रही बोगस आहे. वडगाव येथे हे तयार केलं असून, अल्फिया नावाच्या तरुणीशी रुपेशचं लग्न झाल्याचं प्रमाणपत्रात दाखवलं आहे, असं मोरेंनी यावेळी सांगितलं. तसेच यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, असा कोण खोडसाळपणा करत असेल किंवा जाणूनबुजून आम्हाला डिवचण्याचा प्रकार होत असेल, त्याच्यावर पोलीस कारवाई करतील. आमचा कायदासुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असंही मोरेंनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, या सर्व गोष्टी गंमत म्हणून ठिक होत्या. पण, गेल्या चार-पाच दिवसांपासून तुझ्या डोक्यात गोळ्या घालणार, त्यासाठी चार माणसे नेली आहेत. खराडी पोलीस ठाणे मॅनेज केलं आहे. खराडीत एक इनोवा कार दाखवली आहे. त्यात 30 लाख रूपये आणून ठेव. हलक्यात घेऊ नको. नाहीतर तुला समजेल. निवडणुकीच्या वेळी पाहून घेऊ, अशा धमक्या येत होत्या, असंही मोरेंनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
अशोक चव्हाणांच्या गळ्यात भगवा शेला, चर्चांवर आता चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
“उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा; ‘या’ खासदाराचं मोठं विधान”
चेंजिंग रूममधील व्हायरल व्हिडिओनंतर, गाैतमी पाटील पहिल्यादांच आली समोर, म्हणाली…