पंढरपूर : “ज्यांनी राज्याच्या राजकीय घराण्यात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत, असं म्हणत भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
“ज्यांनी राज्यातल्या घराघरात भांडणं लावली, त्यांच्याच घरात आता टोकाची भांडणं आहेत. मात्र मला त्यांना सांगायचंय की नियतीचा न्याय इथेच असतो. राष्ट्रवादीने गोरगरिबांच्या घरावरुन गाढवाचा नांगर फिरवला. मेंढ्याचं नेतृत्व कधीच लांगडा करत नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी खूप हुशार आहे. बघतानाच गरीब घरचा गृहमंत्री बघतात. साहजिक चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला, असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यावर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”
भाजपचा आमदार फुटला तर, आश्चर्य वाटू देऊ नका- जयंत पाटील
2024 च्या निवडणुकीत काँग्रेस असेल सर्वात मोठा आणि सत्तेतील प्रमुख पक्ष- नाना पटोले