Home जळगाव “भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यावर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”

“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यावर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर बीओटी अंतर्गत बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात 200 कोटींचा मोठा घोटाळा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला असल्याचा गंभीर आरोप ॲड. विजय भास्कर पाटील यांनी केला होता. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आलीये.

3 सदस्यांच्या समितीने व्हीसी रूममध्ये बसून जामनेरच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स बाबत झालेले ठराव, संबधित मंजुरीबाबतची कागदपत्रे, जागेचे नकाशे, मूळ नस्ती यासह सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली.

तुम्ही हे वाचलात का?

बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहितीये त्यामुळे…; पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेवर अप्रत्यक्ष निशाणा

दरम्यान, समितीने आजपासून चौकशीच्या कामाला सुरुवात केली असून राज्यातील बीओटी तत्वावरील हा पहिलाच प्रकल्प होता. तसेच या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली जात असून मुख्य बाबी तपासल्या जात असून कागदपत्रांची पडताळणी करणार आहे, असं चौकशीसाठी आलेल्या समितीचे अध्यक्ष सतिश सांगळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपचा आमदार फुटला तर, आश्चर्य वाटू देऊ नका- जयंत पाटील

2024 च्या निवडणुकीत काँग्रेस असेल सर्वात मोठा आणि सत्तेतील प्रमुख पक्ष- नाना पटोले

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा बो’ल्ड लुक मधील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ