अहमदनगर : भाजपचे नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारसोबतच काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
राज्य सरकारचं गोंधळलेलं आहे. कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही, असा आरोप विखेंनी केला आहे. मी काँग्रेस पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना पद मिळालं. या बाळासाहेब थोरातांचं स्वतःचं कर्तृत्व काय? असा सवालही राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना केला.
राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी पुढाकार घेतला असता, तर आनंद वाटला असता. मात्र केवळ सत्तेत वाटा मिळवण्यासाठी लाचारी केली जात आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
दरम्यान, गांधी-नेहरुंचे विचार सोडून ते मातोश्रीचे उंबरठे झिजवत आहेत, असा टोलाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना लगावला.
महत्वाच्या घडामोडी-
जर जमीन चीनचीच होती तर…; राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल
… मग 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची?; जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधानांना सवाल
राजू शेट्टींच्या विधानपरिषदेचा मार्ग मोकळा; स्वाभिमानीतील वाद मिटला
भारत मजबूत आहे, मजबूर नाही- उद्धव ठाकरे