बीड : महाविकास आघाडीचं सरकार त्यांच्या कर्माने कोसळेल. हे शंभर टक्के सांगतो की महायुतीचे सरकार पुन्हा येईल. भाजप हे सरकार पाडणार नाही. तर महाविकास आघाडीमधील लोकच हे सरकार पाडतील’ असा ठाम विश्वास शिवसंग्रामचे आमदारल विनायक मेटे यांनी व्यक्त केला आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी आहे. नुसते राष्ट्रवादी पक्षाचे आमदार नाराज होवून राजीनामे देण्याच्या तयारीत नाहीत तर शिवसेनेतील संजय राऊत.. ज्यानी संपूर्ण खिंड लढवली ते शपथविधी सोहळ्याला हजर नव्हते. तर रामदास कदमही गेले नाहीत. यांच्या बरोबर अनेक सेनेचे नेते सोहळ्याला हजर नव्हते. काँग्रेसचे काही नेते गेले नाहीत, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे नाराज आमदार राजीनामा देत आहेत. ही तर सुरुवात आहे. “ये तो अभी झाकी है पूरा पिच्चर अभी बाकी है” शेवट काय होणार आहे हे जनतेला माहीत आहे’ अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
महाविकास आघाडी नैसर्गिकरित्या काही नाही. प्रत्येक पक्षाचे विचार वेगळे आहेत. धोरणं, घटना, कार्यक्रम वेगळे आहेत. न जमणार सूत्र जमवायचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळात जाण्यासाठी इच्छुकाची संख्या मोठी आहे. सगळ्यांचे समाधान करू शकत नाहीत. यांचे प्रतिबिंब काल पहायला मिळालं.’ असंही विनायक मेटे म्हणाले
महत्वाच्या घडामोडी-
-राष्ट्रवादीला मोठा धक्का, ‘हा’ आमदार देणार राजिनामा
-कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शपथविधीचा व्हीडिओ
-आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ!
-मिळालेल्या संधीचं सोनं करा, अजित पवारांना शरद पवारांचा मोलाचा सल्ला