आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजप -मनसेच्या युतीचा यशस्वी प्रयोग झाला.
एकनाथवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत मागील 10 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र मनसे-भाजप युती करत राष्ट्रवादीकडून सत्ता काबीज केली.
हे ही वाचा : आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वयंघोषीत हिंदुजननायक मग…; दिपाली सय्यद यांचा मनसेला टोला
मनसेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर व भाजपचे तालुका सरचिटणीस बाबा सानप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भगवान गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली श्रीकृष्ण शेतकरी पॅनल तयार केला. या पॅनलने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा पराभव केला.
दरम्यान, महादेव धोंडिबा खेडकर, शहादेव नामदेव खेडकर, लक्ष्मण पांडुरंग गायकवाड, शहादेव किसन घुले, पांडुरंग रामभाऊ चेमटे, द्वारकाबाई विनायक डोंगरे, महादेव ज्ञानदेव तांदळे, गहिनाथ कारभारी मिसाळ, शोभा राजाराम खेडकर, सुशीला केशव खेडकर, अजिनाथ विक्रम खेडकर, अशी विजयी सदस्यांची नावे आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा; अमृता फडणवीसांची मागणी
…तर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला मतदान केलं असतं; खासदार नवनीत राणांचा धक्कादायक दावा