‘ही’ भाजपची परंपरा नाही; पडळकरांनी केलेल्या टीकेवर भातखळकरांच वक्तव्य

0
174

मुंबई : शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी  केली होती. यावरुन भाजप या शब्दप्रयोगाशी पूर्णपणे असहमत आहे, असं वक्तव्य भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

पडळकर यांनी शरद पवारांविषयी मांडलेल्या भूमिकेबाबत भाजप सहमत नाही, तसेच त्यांनी जो शब्दप्रयोग वापरला तो 100 टक्के चूकीचा आहे. भाजप या शब्दप्रयोगाशी पूर्णपणे असहमत आहे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या राजकीय धोरणाबाबत आमचे मतभेद आहेत. पण सार्वजनिक जीवनात असताना, कोणावरही अशी टीका करणं ही भाजपची परंपरा नाही, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर सुनावणी; ठाकरे सरकारची भक्कम तयारी

पडळकरांच्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही पण…; निलेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा

सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न करु नका; धनंजय मुंडेंची पडळकरांवर टीका

शरद पवार हे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत; पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here