Home महाराष्ट्र ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर सुनावणी; ठाकरे सरकारची भक्कम तयारी

‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर सुनावणी; ठाकरे सरकारची भक्कम तयारी

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारने मराठा आरक्षणासंबंधातली न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी जबरदस्त तयारी केल्याचे समजत आहे.

राज्य सरकार कडून मराठा आरक्षणाबाबतच्या न्यायालयीन लढाईसाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात  झाली. ही बैठक ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली.

येत्या 7 जूलै 2020 रोजी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधातील मूळ याचिकेवर सुनावणी होणार आहे. यासाठी राज्य सरकार अतिशय गंभीरपणे आणि सक्षमपणे काम करीत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी आपल्या राज्य सरकारने संपूर्ण तयारी केली असुन ती आपण जिंकणारच असा विश्वास मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पडळकरांच्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही पण…; निलेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा

सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न करु नका; धनंजय मुंडेंची पडळकरांवर टीका

शरद पवार हे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत; पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य

“गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचं उद्या पुण्यात आंदोलन”