मुंबई : मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगणा रणाैतचं मुंबईतील कार्यालयावर कारवाई केली होती. याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून कंगनाने न्यायालयाने धाव घेतली आहे. या दरम्यान कंगनाची आई आशा रणौत आपल्या मुलीसोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. तसेच त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, असं म्हणत कंगनाच्या आईने शिवसेनेवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारने माझ्या मुलीसोबत चुकीचं केलं आहे. शिवसेना माझ्या मुलीवर अन्याय करत आहे. संपूर्ण भारतातील जनता हे अजिबात खपवून घेणार नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, जर कंगना चुकीची असती तर संपूर्ण देश तिच्यासोबत नसता. हे कसलं सरकार आहे? माझी मुलगी त्याच जनतेतील एक आहे, तिच्यासोबत एवढा अन्याय का? याला सरकार म्हणतात का? ही बाळासाहेबांची शिवसेना नाहीच आहे, ज्या शिवसेनेला आम्ही लहानपणापासून बघत आलोय, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला धारेवर धरलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मराठा आरक्षणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
…त्यामुळे उद्धव ठाकरेंविरोधात अरेतुरेची भाषा सहन करणार नाही- इम्तियाज जलील
आजपर्यंत मी पक्षाच्या आणि नेत्यांच्या विरोधात बोललो नाही, पण…; खडसेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचाही एकेरी उल्लेख चालवून घेतला नसता”