Home महाराष्ट्र आदिवासी मुले, महिलांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा

आदिवासी मुले, महिलांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा

मुंबई : दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील 6 लाख 51 हजार मुलांना आणि 1 लाख 21 हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ही योजना पुढे एक वर्ष राबविण्यात येणार असून 121 कोटी उत्पादन खर्च आला आहे. भुकटीचा प्रती किलो उत्पादन खर्च 246 रुपये 70 पैसे इतका आहे. दूध भुकटीत प्रोटीनचे प्रमाण 34 टक्के आहे आणि या कोविड काळात पोषणासाठी ती उपयुक्त असल्याने मुलांना, स्तनदा व गरोदर मातांना त्याचा अधिक लाभ होईल यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारकडे दूध भुकटीच्या बाबतीत खासदारांमार्फत जोरदार पाठपुरावा करावा अशीही सुचना केली तसेच यासंदर्भात एक पत्रही केंद्राला पाठविण्यात येत आहे असं ते म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी भुकटी मुलाना आणि मातांना पुरविण्याचे व्यवस्थित नियोजन करण्यास आणि यात कुठलीही अडचण येऊ न देण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

फडणवीस सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेला ‘हा’ निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द

सलाम! मातृनिधनाचं दुःख बाजूला सारून आरोग्यमंत्री कर्तव्यावर रुजू

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन कंगणा राणावतचे आदित्य ठाकरेंना ‘हे’ 7 प्रश्न