Home महाराष्ट्र सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन कंगणा राणावतचे आदित्य ठाकरेंना ‘हे’ 7 प्रश्न

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन कंगणा राणावतचे आदित्य ठाकरेंना ‘हे’ 7 प्रश्न

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात विरोधी पक्षाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आरोप करण्यात आले आहेत. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू असल्याचं मत व्यक्त केलं. यावरून अभिनेत्री कंगना रणौतने आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

इतरांवर गलिच्छ राजकारण करण्याचा आरोप करणाऱ्यांनी आधी पाहावं तुमच्या वडिलांनी मुख्यमंत्रीपद कसं मिळवलं, ती एक गलिच्छ राजकारणाची केस स्टडी होईल, बाकी सगळं विसरून जा आधी सुशांत सिंहच्या आत्महत्येबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची उत्तरं द्या, असं म्हणत कंगनाने काही प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून विचारले आहेत.

1) रिया कुठे आहे?

2) सुशांत सिंहच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल मुंबई पोलिसांनी अजून एफआयआर का दाखल केलेला नाही?

3) फेब्रुवारी महिन्यात सुशांतच्या जीवाला धोका असल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या, मात्र मुंबई पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष का केलं?

4) सुशांतच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड अजूनही का तपासण्यात आले नाहीत?

5) तपास पथकाचं नेतृत्व करण्यासाठी आलेल्या आयपीएस विनय तिवारी यांना क्वारंटाईन का केलं?

6) महाराष्ट्र सरकारला सीबीआयची का भीती वाटते?

7) रिया आणि तिच्या कुटुंबियांनी सुशांतचे पैसे का लुबाडले?

दरम्यान, या सात प्रश्नांची उत्तरे कंगनाने ट्विटरवरून मागितली आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

वाढदिवसाचे सेलिब्रेशन टाळले; जितेंद्र आव्हाड यांचे प्लाझ्मादान

मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गेल्या 500 वर्षापासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो, आज ही अपेक्षा पूर्ण होत आहे- एकनाथ खडसे

राममंदिराच्या भूमीपूजनानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…