Home महाराष्ट्र आशा सेविकांसाठी अमित ठाकरेंची अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

आशा सेविकांसाठी अमित ठाकरेंची अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवाची बाजी लावून आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र, आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मानधनासाठी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे नवी मागणी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी आशा स्वयंसेविकांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी अजित पवार आणि राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे.

परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त रु. 1600 मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशां’ना दर महिन्याला रु. 4000 ते 10000 इतका मोबदला मिळत आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा. अशी मागणी अमित ठाकरेंनी अजित पवार आणि राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

https://www.facebook.com/amitthackerayofficial/posts/1194113637609653

महत्वाच्या घडामोडी-

“यंदाचा गणेश उत्सव कोविड-19 च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करु”

नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत; राहुल गांधीचे पंतप्रधानांवर टिकास्त्र

जितेंद्र आव्हाड यांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले…

“माउलींच्या पादुका नेणाऱ्या हेलिकॉप्टरचा खर्च उचलण्यास शिवसैनिकाची तयारी”