Home पुणे “माउलींच्या पादुका नेणाऱ्या हेलिकॉप्टरचा खर्च उचलण्यास शिवसैनिकाची तयारी”

“माउलींच्या पादुका नेणाऱ्या हेलिकॉप्टरचा खर्च उचलण्यास शिवसैनिकाची तयारी”

आळंदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदाचा संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. यावर दिघीतील शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष वाळके यांनी आळंदी देवस्थानकडे निवेदनाद्वारे एक मागणी केली आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुका राज्य सरकार हेलिकॉप्टर किंवा बसद्वारे पंढरीत नेणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे. माउलींच्या पादुका नेण्यासाठी राज्य सरकार देत असलेल्या हेलिकॉप्टर किंवा बसचा संपूर्ण खर्च आम्ही उचलतो. ती जबाबदारी आम्हाला द्यावी, अशी मागणी संतोष वाळके यांनी देवस्थानाकडे केली आहे.

आमच्या घरात पंढरीच्या वारीची आणि अन्नदान करण्याची परंपरा आहे. पालखी मार्गावर दिघी येथे माउलींचा सोहळा आल्यानंतर दरवर्षी जोरदार स्वागत करण्यात येते. आमचे संपूर्ण कुटुंबच वारकरी असून संत ज्ञानेश्‍वर माउलींवर आमची अढळ श्रद्धा आहे.

दरम्यान, यंदा मात्र कोरोनामुळे कोणत्याच प्रकारची सेवा आमच्या कुटुंबाकडून होणार नाही. ही खंत राहू नये, यासाठी माउलींच्या पादुका मोजक्‍या व्यक्तींना सोबत घेऊन हेलिकॉप्टर अथवा बसद्वारे राज्य सरकारकडून पंढरपुरात नेल्या जाणार आहेत, असं संतोष वाळके यांनी या निवेदनामध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या घडामोडी-

चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली; संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका

सुशांतच्या आत्महत्येबाबतआरोपांनंतर सलमान खानने सोडलं मौन; म्हणाला…

देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केले ‘हे’ आरोप

आता ‘आशा’ फक्त मनसेकडूनच; विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचं अमित ठाकरेंना निवेदन