मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नावं काही दिवसांपूर्वी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं. त्यावरून आता जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या नऊ महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम जनतेला आवडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबद्दल जनतेच्या चांगल्या भावना आहेत. त्यामुळे हे सरकार पडणार नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावीत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नारायण राणे यापूर्वी कुठे होते आणि आता ते कुठे आहेत. ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी काय होतं हे राज्यातील जनतेला ठाऊक आहे. प्रवीण दरेकर यांचीही तिच परिस्थिती आहे. त्यांच्या वक्तव्यांना फारसं महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत गलाबराव पाटील यांनी नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांनाही टोला लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
अशा बलात्काऱ्यावर उपचार करू नका, वाचलाच तर… ; मनसे आक्रमक
‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाचं होती का?; चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला सवाल
400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा पुढाकार; नितीन गडकरींना लिहिलं पत्र
दूध दरावरून राजू शेट्टी – सदाभाऊ खोत आंदोलनाच्या मैदानात आमने सामने